Sangli Samachar

The Janshakti News

मुंबईतील 'हा' चौक आता 'श्रीदेवी कपूर चौक' नावाने ओळखला जाणार!



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० मे २०२४
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी 80-90 चं दशक गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या 'हिम्मतवाला', 'मवाली' ते 'लाडला', 'लम्हे', 'चालबाज', 'चांदनी', 'मिस्टर इंडिया' या चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. आजही श्रीदेवी यांची लोकप्रियता तितकीच आहे. 24 फेब्रुवारी 2018 मध्ये त्यांचे दुबईत निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला होता. तर श्रीदेवी यांनी केलेल्या कामासाठी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बृहन्मुंबई नगर निगमनं लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एका चौकाचं नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे. 

रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातं की बीएमसीनं लोखंडवाला कॉम्प्लॅक्समधील एका विशिष्ट चौकाला 'श्रीदेवी कपूर चौक' ठेवलं आहे. हे श्रीदेवी यांना श्रद्धांजली देण्यासाठी आहे. खरंतर ही मागणी रहिवासी आणि पालिकेकडून करण्यात आली होती. लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या त्या चौकाचं नाव श्रीदेवी कपूर ठेवण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण कधी श्रीदेवी या तिथल्याच ग्रीन एकर्स टॉवरमध्ये राहत होत्या. इतकंच नाही तर त्यांचं पार्थीव देखील त्याच ठिकाणाहून नेण्यात आलं होतं. 

दरम्यान, बोनी कपूर यांनी डीएनएला नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिकबद्दल अर्थात बायोपिक बनवण्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत बोनी कपूर म्हणाले की ती एक खासगी व्यक्ती होती आणि त्याप्रमाणेच तिचे आयुष्य हे खासगी राहायला हवं. या कारणामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे होऊ देणार नाही.


दरम्यान, 'चमकीला' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर श्रीदेवी यांच्याविषयी आणखी एक बातमी समोर आली होती. ती म्हणजे दिवंगत गायक चमकिला यांच्या श्रीदेवी फॅन होत्या. त्यांनी चमकीलासोबत काम करण्याचा खूप प्रयत्न केला होता.

ही पहिली वेळ नाही जेव्हा कोणत्या कलाकाराच्या नावावर कोणत्या चौकाचं नाव ठेवण्यात आलं. त्याआधी अमिताभ बच्चन, राज कपूरसोबत अनेक कलाकारांच्या नावावर वेगवेगळ्या जागांचं नाव ठेवण्यात आलं. उत्तर भागात असलेल्या सिक्किममध्ये एक वॉटरफॉल आहे. त्याचं नाव 'बिग बी' असं आहे. त्याशिवाय सिंगापुरच्या एका आर्किडचं नाव 'डेंड्रोबिम अमिताभ बच्चन' असं आहे. कॅनडाच्या एक रस्त्याचं नाव 'राज कपूर क्रेसेन्ट' असे आहे.