| सांगली समाचार वृत्त |
मुंबई दि. ६ मे २०२४
उन्हाळा सुरू होताच फळांचा राजा आंबा बाजारात सर्वत्र दिसू लागतो. पिवळ्या, गोड आणि रसाळ आंब्याची चव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. लोक आंबा इतर फळांप्रमाणे कापून खातात. तसेच त्यापासून आईस्क्रीम, मँगो शेक इत्यादी बनवून सुद्धा खातात. मात्र आंब्याचा हंगाम संपल्यानंतर आंबा चाखायला मिळत नसल्याने आंबाप्रेमींसाठी ते अडचणीचे ठरते. जर तुम्हालाही आंब्याचा ताजेपणा जास्त काळ साठवायचा असेल किंवा बाजारातून जास्त आंबे विकत घेतले असतील आणि ते खराब होण्यापासून वाचवायचे असतील तर हे किचन हॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
आंबे साठवण्यासाठी टिप्स
जे पिकलेले आंबे साठवायचे आहे ते सोलून त्याचे मोठे तुकडे करा. आता या तुकड्यांवर थोडी साखर शिंपडा आणि २-३ तास फ्रीजरमध्ये ठेवा. यानंतर हे आंब्याचे तुकडे एअर टाईट डब्यात ठेवा आणि फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवा. या हॅकच्या मदतीने तुम्ही १-२ महिने पिकलेल्या आंब्याचा आनंद घेऊ शकता.
साठवण्यासाठी असे निवडा आंबे
काही कारणास्तव जर तुम्ही बाजारातून आवश्यकतेपेक्षा जास्त आंबे विकत घेतले असतील तर तुम्ही ते साठवून ठेवू शकता. मात्र यासाठी तुम्हाला असे आंबे निवडून वेगळे करावे लागतील जे पिकलेले असूनही कडक किंवा टाइट असतील. खूप नरम झालेले किंवा रसाळ आंबे जास्त काळ ताजे ठेवणे थोडे कठीण आहे.
फ्रीजमध्ये ठेवा
पिकलेले आंबे जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ते फ्रीजमध्ये सुद्धा ठेवता येतात. आंबा फ्रिजमध्ये ६ दिवस टिकतो. पण यासाठी फ्रीजचे अंतर्गत तापमान ४०°F म्हणजेच ४°C वर सेट केले पाहिजे. यापेक्षा जास्त तापमानात साठवलेले आंबे खराब होऊ शकतात.
आइस क्यूब बनवून साठवा
आंबा साठवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याला आइस क्यूब बनवून साठवणे. ही टीप फॉलो करण्यासाठी आंब्याची प्युरी बनवा. ही प्युरी एका बर्फाच्या ट्रेमध्ये भरा आणि फ्रिज करा. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास हा आंब्याचा पल्प तुम्ही झिप लॉक बॅगमध्येही बंद करून ठेवू शकता.
पेपर बॅग
जर तुमच्याकडे फ्रीज नसेल आणि तुम्हाला आंबा काही दिवस साठवायचा असेल तर तुम्ही आंबा कागदाच्या पिशवीत ठेवू शकता. कागदी पिशवी अतिरिक्त ओलावा शोषून घेते आणि ते लवकर खराब होण्यापासून रोखते.