| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३० मे २०२४
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. सहा टप्प्यातील मतदान आतापर्यंत पार पडले आहे. येत्या 2 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रात नवे सरकार स्थापन होताच भारतीय लष्कराला अधिक शक्तिशाली बनवण्याची तयारी सुरु होणार आहे. मात्र केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. नवीन सरकार स्थापन होताच K-9 वज्र ऑटोमॅटिक हॉवित्झर सारख्या अनेक संरक्षण सौद्यांना मंजुरी मिळणार आहे. इंडिया टुडेने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की, 30 MKI साठी आणखी 100 K9 वज्र तोफा आणि इंजिन खरेदी करण्यासाठी 6,000 कोटी रुपये खर्च केले जातील. ही सर्व शस्त्रे स्वावलंबी प्रकल्पांतर्गत भारतात बनवली जाणार आहेत.
संरक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्राकडून मंजूर करण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये क्षेपणास्त्र विकास प्रकल्पांचाही समावेश आहे, जे संशोधन आणि विकासासाठी हाती घेतले जातील. ते पुढे म्हणाले की, के-9 वज्र पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे. आणखी 100 K-9 वज्र भारतीय लष्करासाठी लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. K9 वज्रचे वजन 50 टन असून ते 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत शेल फायर करु शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच जोर दिला आहे की, पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांचे सरकार जलद निर्णय घेईल आणि सर्व अजेंडांवर काम करेल. सरकारने तयार केलेल्या दुसऱ्या मोठ्या प्रकल्पात Su-30 लढाऊ HK विमान खरेदीचा समावेश आहे. या करारामध्ये 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कोरापुट युनिटमध्ये परवान्याअंतर्गत उत्पादित केल्या जाणाऱ्या सुमारे 200 इंजिनांच्या खरेदीचा समावेश असेल.