yuva MAharashtra अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास मोठी कारवाई - प्रशांत साळी

अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास मोठी कारवाई - प्रशांत साळी



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० मे २०२४
अल्पवयीन म्हणजे 16 ते 18 वयोगटातील मुले वाहन चालवताना आढळल्यास पालकांना पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्ष शिक्षा अशी शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना शासकीय नियमाप्रमाणे पालन करून वाहन चालवण्यास द्यावे असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांनी केले आहे.


पुणे अपघात प्रकरणानंतर विभागामार्फत कडक धोरण अवलंबण्यात येत आहे . असे सांगून साळी म्हणाले की, गेल्या एक महिन्यात 55 पालकांवर असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळलेस त्यांच्यावर शासकीय नियमानुसार तर कारवाई करण्यात येणार आहेच, पण पालकांवर हे दंडात्मक कारवाई होऊ शकते. अल्पवयीन मुले वाहन चालवताना सापडल्यास, त्यांना 25 वर्षे वयापर्यंत लायसन्स मिळणार नाही. त्यामुळे पालकांनी कायद्याचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन साळी यांनी केले आहे.