yuva MAharashtra बँकांच्या नावाने येणारे फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारची नवी यंत्रणा !

बँकांच्या नावाने येणारे फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारची नवी यंत्रणा !



| सांगली समाचार वृत्त |
 नवी दिल्ली - दि. ३१ मे २०२४
सध्या सायबरचोरटे विविध क्रमांकावरून फोन करून खोटी माहिती देऊन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी दूरसंचार विभागाने आता १० अंकी क्रमांक आणला असून या द्वारे फसवणुकीचे हे प्रकार रोखण्यास मदत होणार आहे. १० अंकी क्रमांकाची सुरुवात ही १६० ने होणार असून सरकारी आणि दूरसंचार नियामकांसाठी १६००ABCXXX स्वरूपात हा क्रमांक जारी केला जाणार आहे.

वाढत्या फोन कॉल घोटाळ्यांदरम्यान, दूरसंचार विभागाने (DoT) फसवणूक करणाऱ्यांकडून आलेले खरे कॉल ओळखण्यासाठी एक नवी यंत्रणा तयार केली आहे. दूरसंचार विभागाने सरकार, नियामक आणि वित्तीय संस्थांनी केलेल्या सेवा आणि व्यवहार कॉलसाठी १६० ने सुरू होणारी समर्पित १० अंकी क्रमांकाची मालिका सुरू केली आहे. १६० ने ही १० अंकी मालिका ओळखली जाणार आहे. या द्वारे बँक, सरकारी विभागांकडून येणारे कॉल समजणार आहेत.


दूरसंचार विभाग वित्तीय संस्था आणि दूरसंचार ऑपरेटरद्वारे केलेल्या सेवा आणि व्यवहार-संबंधित कॉलसाठी स्वतंत्र १० अंकी क्रमांक जारी केला जाईल. १० अंकी क्रमांकाची सुरुवात ही १६० असेल आणि हा क्रमांक सरकार, वित्तीय संस्था आणि दूरसंचार नियामकांसाठी 1600ABCXXX स्वरूपात जारी केला जाणार आहे. एबी हा दूरसंचार मंडळाचा कोड दर्शवणार आहे. जसे की दिल्लीसाठी ११, मुंबईसाठी २२. तर सी हा ठिकाणावरील अंक टेलिकॉम ऑपरेटरचा कोड दर्शवेल. XXX हे 000-999 दरम्यानचे पुढील १० अंकी क्रमांक राहतील.

वित्तीय संस्थांसाठी क्रमांक 1601ABCXXX स्वरूपात जारी केले जातील. त्याचप्रमाणे, RBI, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण(PFRDA) आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) द्वारे नियमन केलेल्या वित्तीय संस्थांसाठी, १० अंकी क्रमांक 1601ABCXXX फॉरमॅटमध्ये जारी केला जाईल.

कार्यालयातील एका मेमोरँडमनुसार, १० अंकी क्रमांकाची मालिका दूरसंचार विभागाद्वारे अशा प्रकारे तयार केली गेली आहे की नागरिकांना कॉलिंग संस्था तसेच दूरसंचार ऑपरेटर आणि फोन नेमका कोठून आला त्याबद्दलची माहिती मिळेल.


"टेलिकॉम कमर्शिअल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरेंस रेग्युलेशन (TCCCPR) २०१८ नुसार सेवा आणि ट्रान्झॅक्शनल व्हॉईस कॉलसाठी आता प्ले ची स्वतंत्र क्रमांकन मालिका १६० वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे" असे अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दूरसंचार सेवा पुरवठादार १६० मालिकेतील क्रमांक देण्यापूर्वी प्रत्येक बाबींची पडताळणी करेल. यानंतर दूरसंचार सेवा पुरवठादार मागणी करणाऱ्या संस्थेकडून हमीपत्र घेऊन १६० मालिकेतून नियुक्त केलेला नंबर दिला जाईल. हा क्रमांक केवळ सेवा आणि व्यवहारासाठी वापरता येणार आहे.

अलीकडे, दूरसंचार विभागाने फोन द्वारे होणाऱ्या फसवणुकीची तक्रार केल्याबद्दल जागरुक आणि सतर्क नागरिकांचे आभार मानले. कारण सरकार देशातील फसव्या कॉलच्या धोक्याविरुद्ध मोठा लढा देत आहे. यावर उपाय म्हणून दूरसंचार विभागाने बनावट तेच फसवणुक करणाऱ्या अनेकांवर कारवाई केली आहे. सजग नागरिक सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मोठी भूमिका बजावत आहेत.