yuva MAharashtra संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल इ.१०वीचा निकाल १०० टक्के कायम

संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल इ.१०वीचा निकाल १०० टक्के कायम



| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २८ मे २०२४
मिरज येथील संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल मधील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सलग तेरा वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राखली. या यशात विद्यार्थ्यांची अभ्यासाबद्दल असलेली आवड, परिश्रम त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न व त्यांना मिळालेले शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.


या परीक्षेत प्रथम क्रमांक अनुष्का विजय भंडारे ९७.४०%, द्वितीय क्रमांक अमृता छगन मालवे ९५.८०%, तृतीय क्रमांक विधी रमेश शेट्टी ९५.४०% तसेच चतुर्थ श्रेयस प्रताप कदम व स्वप्ना चंद्रहास कुरणे ९४.४०% तर पाचवा अमृत कुंभोजे ९४.२०% असे गुण मिळवुन विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे संस्थेचे संस्थापक पृथ्वीराज पाटील, संस्थेचे विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, संस्थेचे अधीक्षक डॉ. सतीश पाटील, अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन व शाळेचे मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत यांनी अभिनंदन करीत कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले.