yuva MAharashtra तापमान 40 पार तर मतदान 55 पार !

तापमान 40 पार तर मतदान 55 पार !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ मे २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान करा त्याच्या उन्हातही अत्यंत चुरशीने पार पडले. दुपारी एक वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा 40 अंशाकडे झोपत असताना वाढत असतानाच मतदानाचा टक्काही चाळीशी पार पोहोचला होता. सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण टक्के मतदान झाले.

उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच मंगळवारी मतदानादिवशी अनेक मतदान केंद्रांवर भर उन्हात मतदारांच्या रांगा लागल्याचे तसेच उन्हाची तीव्रता असतानाही मतदानाला लोक जातानाचे समाधानकारक चित्र दिसून आले.


सांगली जिल्ह्याच्या विविध भागांत मतदानाचा उत्साह दिसून आला. सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर काही ठिकाणी मतदान केंद्र ओस पडली असली तरी बऱ्याच गावांमध्ये व शहरात भर उन्हातही नागरिक मतदानासाठी बाहेर पडताना दिसून आले. उन्हाच्या तीव्र झळा असतानाही मतदानाचा उत्साह दिसून आला. शाळांच्या वऱ्हांड्यात सावली असल्याने त्याठिकाणी रांगेत थांबणे मतदारांना सोयीचे हाेते. काही शाळांमध्ये लांब रांगा असल्यामुळे उन्हामध्ये थांबावे लागले. तरीही मतदानाचा हक्क बजावण्यात आला.

उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे सांगली, मिरज शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पक्षीय बुथसाठी मंडप उभारले होते. काहींनी मोठ्या छत्र्या लावून बुथवर काम केले. उन्हाच्या तीव्रतेचा अंदाज घेऊन अनेकांनी इमारतीच्या छताखाली, झाडाच्या सावलीत बुथ उभारले होते.

सांगलीचा पारा चाळीशी पार गेला होता. मागील दोन दिवसांच्या तुलनेत अंशाने घट नोंदली गेली. तरीही दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता कायम होती.

उन्हाच्या तीव्र झळांचा सामना मतदान केंद्रावर बंदोबस्तावर असलेल्या पोलिस व होमगार्डच्या जवानांना करावा लागला. काही पोलिसांनी झाडाखाली आसरा घेतला, तर केंद्रामध्ये नियुक्त पोलिसांना सावली लाभली. बाहेरील बंदोबस्तात असलेल्या पोलिसांचे मात्र हाल झाले.

अनेक शाळांमध्ये पंखे नव्हते. वऱ्हांड्यातही फारसा गारवा नव्हता. त्यामुळे मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांसह रांगेत थांबलेले मतदार घामाने भिजले होते. तरीही मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. दरम्यान उन्हापासून बचाव म्हणून अनेक मतदार चारचाकी, तीनचाकी वाहनातून मतदान केंद्रापर्यंत आले होते. उन्हात चालत येणे मतदारांनी टाळले. छाेट्या गावांमध्येही हे चित्र दिसून आले. एकंदरीत राज्यातील अन्य ठिकाणच्या मतदान केंद्रापेक्षा सांगलीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत असताना अंगाच्या लाही लाही करणाऱ्या उन्हाचा चटका सहन करीत मतदानाचे पवित्र कार्य पार पाडले. 

दरम्यान चार जून पर्यंत लोकसभा मतदारसंघातील वातावरण हे टाकलेलेच राहणार आहे. ज्याप्रमाणे शिमगा संपल्यानंतरही कवित्व मागे राहते असे म्हणतात, त्याप्रमाणे प्रचारादरम्यान झालेल्या आरोप प्रत्यारोपाच्या झळा आणि त्यावर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया या पुढील महिन्यावर सुरूच राहणार आहेत. आज मतदान यंत्रात बंद झालेले यशा अपयशाचे भविष्य चार जूनला जाहीर होईल, त्यानंतर पुन्हा धुरळा.