yuva MAharashtra लग्नपत्रिकेऐवजी नवरदेवाने वाटलं ATM कार्ड, !

लग्नपत्रिकेऐवजी नवरदेवाने वाटलं ATM कार्ड, !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ मे २०२४
सध्या लग्नसराई सुरु आहे. प्रत्येक जण आपलं लग्न काहीशा खास पद्धतीने करत अविस्मरणीय क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. काही लोक लग्नाची एन्ट्री दिमाखदार करतात, तर काही जण आणखी काही वेगळी शक्कल लढवतात. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. लग्नासाठी सजावटी, कपड्यांपासून ते स्टाईलपर्यंत अनेक हटके ट्रेंडचे व्हिडीओ समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर एटीएम वेडींग कार्डची तुफान चर्चा आहे. तुम्ही ही आगळी-वेगळी लग्नपत्रिका पाहिली का?

लग्नपत्रिकेएवजी नवरदेवाने वाटलं ATM कार्ड

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या लग्नात काहीतरी हटके करण्याचा आजकाल जणू ट्रेंडचं बनला आहे. आता याचं ट्रेंडमधील एक वेडींग कार्ड सध्या चर्चेत आहे. एका जोडप्याने आपल्या लग्नात चक्क एटीएम कार्ड वाटलं आहे. आता तुम्हालाही हे वेडींग कार्ड मिळालं असेल, तर हे कार्ड घेऊन तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला जाऊ नका, कारण तुमचा पोपट होऊ शकतो. कारण हे एटीएम कार्ड एक लग्नपत्रिका आहे.


नेमकं प्रकरण काय?

एका जोडप्याने आपल्या लग्नासाठी आगळी-वेगळी लग्नपत्रिका छापली आहे. सध्या ही खास लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर या लग्नपत्रिकेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ही लग्नपत्रिका एखाद्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डप्रमाणे छापण्यात आली आहे. या कार्डच्या एका बाजूसा नवरदेव आणि वधूचं नाव, लग्नाची तारीख, वार, मुहूर्त लिहिलं आहे, तर दुसऱ्या बाजूला विवाहस्थळ अशी इतर माहिती देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ही आगळी-वेगळी लग्नपत्रिका @itsallaboutcards या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी ही भन्नाट कल्पना फारच आवडली आहे. हे मिनीमलिस्ट वेडिंग कार्ड अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. काही नेटकरी तर याचं कौतुक करताना दिसत आहेत, तर काही जण याचा कल्पनेचा भविष्यात वापर करणार असल्याचं सांगत आहे.