yuva MAharashtra सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि सेवक हेच कर्मवीर पतसंस्थेचा आधारस्तंभ - रावसाहेब पाटील

सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि सेवक हेच कर्मवीर पतसंस्थेचा आधारस्तंभ - रावसाहेब पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० मे २०२४
कर्मवीर पतसंस्थेचा नांवलौकीक महाराष्ट्रात होत आहे कारण या संस्थेच्या सभासदांनी दिलेला विश्वास, ठेवीदारांनी ठेवीच्या रुपाने व्यक्त केलेले प्रेम, कर्जदारांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करुन त्यांनी स्वतःची प्रगती साध्य करुन घेऊन संस्थेचे कर्ज वेळेत परत फेड केली आणि संस्थेचा सेवक वर्ग प्रामाणिकपणे संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देत आहे आणि या सर्वामध्ये योग्य समन्वय राखून संस्थेचे व्यवस्थापन योग्य दिशेने काम करीत असल्यामुळे कर्मवीर पतसंस्थेची प्रगती होत आहे. म्हणुनच सभासद, ठेवीदार, कर्जदार, सेवक व संचालक हेच कर्मवीर पतसंस्थेचा खरा आधार आहेत असे मत संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी व्यक्त केले. संस्थेच्या नांद्रे शाखेच्या कार्यालयाचे प्रशस्त अद्ययावत वास्तुमध्ये रुपांतर करण्यात आले त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी केले. ही शाखा सुरु होवून २८ वर्षे पुर्ण झाली. सभासदांचा वाढता प्रतिसाद पाहून संस्थेने या शाखा कार्यालयाचे वाढीव प्रशस्त व आधुनिक कार्यालयात रुपांतर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक, सामाजिक कार्याचा आढावा घेतला. संस्था ६२ शाखा मधुन कार्यरत आहे. संस्थेची सभासद संख्या ६४००० आहे. संस्थेकडे रु. १०९० कोटीच्या ठेवी जमा आहेत. तर रु ८११ कोटीचे कर्ज वाटप करुन विकासाच्या कामाला हातभार लावला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विविध संस्थांच्यावतीने श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील व डॉ. अशोक आण्णा सकळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नांद्रे शाखेचे सल्लागार श्री. जिनेश्वर आण्णासाहेब पाटील (गा.का.) श्री. चवगोंडा बाबगोंडा पाटील (घुमट), श्री. रावसाहेब आण्णा पाटील (मोनू) श्री. कुमार जिनगोंडा पाटील (लिगोंडा) श्री. श्रीपाल रामगोंडा पाटील (माणगांवे). डॉ. एन.बी. पाटील, श्री. अनिल जयकुमार पाचोरे, श्री. आप्पासाहेब जिनगोंडा पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम विभागीय अधिकारी श्री. अशोक विद्याधर राजोबा, शाखाधिकारी श्री. सुजित शांतीनाथ खोत यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास नांद्रे चे माजी सरपंच श्री. राजगोंडा पाटील (घुमट) विष्णुआण्णा खरेदी विक्री संघाचे संचालक श्री. चंद्रशेखर शेटे. मिरज पंचायत समिती माजी सभासती राहुल सकळे, नांद्रे विकास सोसायटीचे चेअरमन श्री. मनोज पाटील, सुदर्शन मद्वाण्णा. श्री. प्रकाश पाचोरे, विराचार्य पतसंस्थेचे चेअरमन श्री. एन. जे. पाटील, संचालक श्री. अरुण पाटील, ग्रा.प. सदस्य श्री. सत्तारभाई मुजावर इंटेरिअर डेकोरेटर श्री. अक्षय पाटील हे उपस्थित होते. या सर्वांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.

या वेळी संस्थेचे संचालक ॲड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. ए. के. चौगुले (नाना) डॉ. एस.बी. पाटील (मोटके) संचालिका सौ. चंदन नरेंद्र केटकाळे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सभासद सेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संस्थेचे संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले मानले. सुत्रसंचलन श्री. संजय सासणे यांनी केले.