yuva MAharashtra सांगली महापालिका क्षेत्रात 31 अनधिकृत होर्डिंग !

सांगली महापालिका क्षेत्रात 31 अनधिकृत होर्डिंग !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ मे २०२४
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्यभरातील अनधिकृत होर्डिंग हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनीही सांगली महापालिका क्षेत्रात असलेल्या होर्डिंगचा सर्व्हे करण्याचे व बेकायदेशीर होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले होते.  


मिळालेल्या माहितीनुसार सांगली महापालिका क्षेत्रात 31 असे होर्डिंग आढळून आले. महापालिकेतर्फे अशा होर्डिंग एजन्सीजना नोटीसा देण्यात आला असून, ते हटवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. संबंधित एजन्सी हे होर्डिंग हटवले नाही, तर महापालिकेतर्फे ती हटविण्यात येणार आहेत. कोल्हापूर रोडवरील २० बाय ५० आकाराचे अवाढव्य होर्डिंगचा सांगाडा नुकताच जमीनदोस्त करण्यात आला आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण हटाव विभागामार्फत सांगण्यात आले.