yuva MAharashtra 'हे' आहे जगातील सर्वात छोटं शहर, इथं राहतात फक्त 20 ते 30 लोकं..

'हे' आहे जगातील सर्वात छोटं शहर, इथं राहतात फक्त 20 ते 30 लोकं..



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १७ मे २०२४
भारतातील छोट्या शहरांमधून लोक मोठ्या शहरांमध्ये जातात, तेव्हा ते शहर किती दूरवर पसरलंय हे पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. खूप प्रवास करूनही त्यांना शहराबाहेर पडता येत नाही. पण लहान शहरांमध्ये असं नाही. दिल्लीसारख्या शहरात तुम्ही 20-30 किलोमीटरचा प्रवास केला तरीही तुम्ही दिल्लीतच असाल, पण छोट्या शहरांमध्ये इतका प्रवास केल्यास तुम्ही शहरापासून दूर असाल. तुम्हाला जगातील सर्वात लहान शहर कोणतं हे माहीत आहे का? हे शहर भारतातील अनेक लहान शहरांपेक्षा लहान आहे. या शहराबद्दल जाणून घेऊयात.


युरोपमधील क्रोएशिया देशात वसलेल्या हुम शहराला जगातील सर्वात लहान शहराचा दर्जा मिळाला आहे. एक्सपॅट इन क्रोएशिया वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, हे शहर बुझेट नावाच्या शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर आहे. शहरात फक्त 20 ते 30 लोक राहतात आणि फक्त 2 मोठे रस्ते आहेत. आता तुम्हाला तुम्ही विचार करत असाल की जर हे शहर इतकं लहान आहे तर मग ते गाव का नाही आणि शहर का मानलं जातं? प्लेसेस ऑफ जुमा वेबसाइटनुसार, हुममध्ये टाउन वॉल, टाउन गेट, एक स्मशान, दोन चर्च आणि एक रेस्टॉरंट आहे. यासोबतच इथं काही निवासी इमारतीही आहेत. हे शहर 12.95 चौरस किलोमीटरमध्ये वसलेलं आहे.

मोठ्या शहरांशी जोडलेलं आहे हे शहर

16 व्या शतकापासून इथं नगरपालिकेची निवड करण्यात आली आणि 1977 मध्ये हे काम पुन्हा सुरू करण्यात आले, त्यामुळे हे शहर मानलं जातं. हे शहर खूप प्राचीन आहे. इथले रस्ते प्राचीन दगडांनी बांधलेले आहेत. 11 व्या शतकात इथं सर्वात आधी घरं बांधायची सुरुवात झाली होती. या शहराचा पहिला उल्लेख 1102 मध्ये काही कागदपत्रांमध्ये आढळतो. हे शहर क्रोएशियाच्या मोठ्या शहरांशी जोडलेलं आहे. याठिकाणी कारने पोहोचता येतं आणि इथं सायकलिंग देखील करता येतं.

शहरात खूप आधी व्हायची लूट

या शहरात शेकडो वर्षांपूर्वीचे किल्ले आणि त्या काळातील भिंतीही आहेत. शहराच्या भिंतींच्या आत घरं बांधली होती, जी 11 व्या शतकातील आहे, नंतर या भिंतींच्या बाहेर घरांचे बांधकाम सुरू झाले. रिपोर्टनुसार, हे शहर लूट आणि युद्धाच्या सावलीखाली राहिलं, पण शहराचा आताच लूक 19व्या शतकात तयार झाला.