yuva MAharashtra सांगलीत जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटी पुर्ततेकरीता 20 ते 22 मे रोजी विशेष मोहिम

सांगलीत जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटी पुर्ततेकरीता 20 ते 22 मे रोजी विशेष मोहिम



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ मे २०२४
ग्रामपंचायत निवडणूक ऑक्टोबर 2023 मध्ये राखीव प्रवर्गावर निवडून आलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर केला आहे, तथापी त्रुटी पुर्तता केली नाही अथवा समिती कार्यालयाशी संपर्क केला नाही, अशा उमेदवारांकरीता तालुकानिहाय विशेष मोहिम 22 व 23 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. 


या विशेष मोहिमेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता वाळवा-इस्लामपूर, शिराळा व तासगाव तालुक्यासाठी 20 मे, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस व आटपाडी तालुक्यासाठी 21 मे तर मिरज, खानापूर-विटा व जत तालुक्यासाठी 22 मे रोजी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली येथे विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगलीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बाळासाहेब कामत यांनी दिली. संबंधित सर्व उमेदवारांनी / अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत मुळ कागदपत्रांसह स्वत: उपस्थित रहावे, असे आवाहन कामत यांनी केले आहे.