| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १० मे २०२४
आज अक्षय तृतीया, साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला आजचा दिवस खूप शुभ आणि मंगल समजला जातो. अक्षयतृतीयेच्या या मंगलदिनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या , लाडक्या गणरायाभोवती आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर मंदिरावर फुलांनी आंब्याची प्रतिकृती देखील साकरण्यात आला. तसेच प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंतगी रंगीबेरंगी फुलांनी डोळ्यांना सुखावाणारी सजावट तरकण्यात आली. अशा या मंगलमय वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली. पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजिण्यात आला. त्यानंतर आंब्याचा हा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. मंदिरात केलेली ही आंब्याची आरास पाहण्यासाठी तसेच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
अक्षय्य तृतीया साजरी का केली जाते ?
शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेची तिथी आज आहे. वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या दिवसाचं खास महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसांपैकी एक आहे. हा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो. या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळतं असे देखील म्हणतात. 'न क्षय इति अक्षय' म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, तो अक्षय होय. त्यामुळे या दिवशी जे काही शुभ कार्य, उपासना किंवा दान वगैरे केले तर ते सर्व अक्षय्य होते.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया या दिवसाचं हिंदू धर्मीयांमध्ये विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी दिलेलं दान अक्षय्य ( कधीच क्षय न होणारं) असतं असं मानून दान धर्म करण्याची रीत आहे. पाणी, मडकं दान ते अगदी सोनं खरेदी अशा विविध गोष्टी आज केल्या जातात. भारतामध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सणांमधूनही ही वृत्ती जोपासण्यासाठी आजचा अक्षय्य तृतीयेचा दिवस विशेष आहे. मान्यतांनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केल्याने ते अक्षय आणि पुण्यकारक असते. त्यामुळे आपल्या सोयीनुसार आज दानधर्म करू शकता.