yuva MAharashtra राऊत यांनी मागणी केली. पटोले यांनी इशारा दिला, पण पुढे काय ?

राऊत यांनी मागणी केली. पटोले यांनी इशारा दिला, पण पुढे काय ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१९ एप्रिल २०२४
महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन तिढा सुरू आहे. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे असून काँग्रेसच्याविशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांना इशारा दिला आहे.


काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अजूनही सांगली लोकसभेवरुन दावा सोडलेला नाही. विशाल पाटील यांनी सोमवारी एक काँग्रेसमधून आणि दुसरा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे कोंडी होत असल्याचे दिसत आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसकडे कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, आज नाना पटोले यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. नाना पटोले म्हणाले, विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू. विशाल पाटील यांनी पक्षशिस्त मोडली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई देखील करु, असा इशाराही नाना पटोले यांनी विशाल पाटील यांना दिला. "विशाल पाटील यांना आम्ही समजावत आहोत, असंही पटोले म्हणाले.

आता काँग्रेस विशाल पाटील यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.