yuva MAharashtra सांगलीत आज व उद्या सहकार भारती सांगली महानगरच्या वतीने भव्य पापड महोत्सव !

सांगलीत आज व उद्या सहकार भारती सांगली महानगरच्या वतीने भव्य पापड महोत्सव !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२७ एप्रिल २०२४
सहकार भारती सांगली महानगरच्या वतीने दिनांक २७ व २८ एप्रिल रोजी कच्छी जैन भवन सांगली मिरज रोड सांगली येथे भव्य पापड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरोघरी पापड व तत्सम वाळवण पदार्थांची आवश्यकता असते बचत गटाच्या महिला उद्योग म्हणून पापड व तत्सम पदार्थ करीत असतात या दोन्हींची सांगड घालण्याचा प्रयत्न सहकार भारतीच्या मार्फत करण्यात आला आहे.


सहकार भारती नेहमीच बचत गटांसाठी अनेक उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून पापड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगलीमध्ये अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे. आत्तापर्यंत होणारे प्रदर्शन किंवा महोत्सव हे संमिश्र सर्व प्रकारच्या वस्तू त्यामध्ये असतात प्रथमच फक्त पापड व वाळवणाचे पदार्थ या प्रदर्शनामध्ये आपल्याला एकाच छताखाली ४० पेक्षा जास्त बचत गटांचे स्टॉल्स यामध्ये सहभागी होणार आहेत. सांगलीकर नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पापड महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन सहकार भारतीचे महानगर अध्यक्ष शशिकांत राजोबा व महामंत्री शैलेश पवार यांनी केले आहे.