yuva MAharashtra खा. संजय काकांनी साधला भल्या पहाटे नागरिकांशी संवाद, घेतल्या विजयासाठी शुभेच्छा

खा. संजय काकांनी साधला भल्या पहाटे नागरिकांशी संवाद, घेतल्या विजयासाठी शुभेच्छा



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. संजय काका पाटील यांच्या मॉर्निंग वॉकच्या वेळी नागरिकांशी साधलेल्या संपर्क मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळाला असून काकांना विजयासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या सांगलीत वातावरणातील गर्मी आणि राजकीय ज्वर दोन्हीही जोरदारपणे तापलेले आहे. अशावेळी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधून आपली भूमिका व मोदी सरकारच्या योजना आणि गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामाची माहिती दिली.

तंदुरुस्तीसाठी शहरातील विविध भागात जे नागरिक पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक करीत असतात, अशा नागरिकांना भेटून खा. संजय काका यांनी संवाद साधला. शहरातील योगा क्लब, स्विमिंग टॅंक, हास्य क्लब, महावीर उद्यान, आमराई, छत्रपती शिवाजी क्रीडांगण या ठिकाणी नागरिक, महिला, खेळाडू, वृत्तपत्र विक्रेते आदींशी संपर्क साधला.


यावेळी खा. संजय काकांच्या बरोबर भाजपाचे तसेच सहयोगी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते. या पहाटेच्या संपर्क दौऱ्याची सुरुवात आंबेडकर स्टेडियम जवळ असलेल्या वृत्तपत्र वितरण केंद्रापासून झाली. नागरिकांशी सर्वाधिक जवळीक असलेल्या या घटकांच्या अडचणी समजावून घेऊन, त्या सोडवण्याचे आश्वासन खा. संजय काका यांनी दिले. त्यानंतर काका पोहोचले ते थेट सांगली बस स्थानकामध्ये. असलेल्या चहा, नाश्ता सेंटर या ठिकाणी असलेल्या नागरिकांशी त्यांनी संपर्क साधला व आपणास पाठिंबा देण्याची विनंती केली.

यानंतर काकांनी विविध जिम्सना भेट देऊन तेथील तरुणांची संवाद साधला, तसेच सिविल हॉस्पिटल मार्गावरील त्रिकोणी बागेत आलेल्या नागरिकांशी त्यानी संपर्क साधला. त्यांच्याशी मनमोराच गप्पा मारल्या व त्यांच्या अडचणी ही समजून घेतल्या.

या सर्वच ठिकाणावरून संजय काकांना जोरदार प्रतिसाद मिळाला असून नागरिकांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.