yuva MAharashtra महा युतीच्या सर्व घटकांनी संजयकाकांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत : निर्मलकुमार सुराना

महा युतीच्या सर्व घटकांनी संजयकाकांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत : निर्मलकुमार सुराना



सांगली समाचार - दि. १२ एप्रिल २०२४
सांगली - महा युतीच्या सर्व घटकांनी खासदार संजयकाका पाटील यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन, भाजपा महाराष्ट्र राज्य सह प्रभारी निर्मलकुमार सुराना यांनी केले.  सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन व महा युतीची आढावा बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीत पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जनसुराज्य पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, ज्येष्ठ नेते दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, विद्युत मंडळ संचालक निताताई केळकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पू डोंगरे, युवा नेते पृथ्वीराज पवार, युवराज बावडेकर, लक्ष्मण नवलाई, केदार खाडीलकर यांच्या सह महा युतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


निर्मलकुमार सुराना यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रचार यंत्रणा याबाबत मार्गदर्शन केले. महा युतीतील घटक पक्षांचा प्रचारात सहभाग, विधानसभा क्षेत्र निहाय तसेच प्रभाग निहाय प्रचार राबविण्याचे विविध मार्ग सांगितले. भाजपा अंतर्गत सर्व संघटनांच्या बैठका घेऊन नव्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.