yuva MAharashtra जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न विशालदादा पाटीलच पूर्ण करू शकतात - जयश्रीताई पाटील

जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न विशालदादा पाटीलच पूर्ण करू शकतात - जयश्रीताई पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२६ एप्रिल २०२४
जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न विशालदादा पाटीलच पूर्ण करू शकतात. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता लिफाफा चिन्ह लोकापर्यंत पोहचवावे, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी केले. सांगली शहरातील गावभाग परिसरात जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत प्रचार बैठका झाल्या. यावेळी त्या बोलत होत्या. गावभाग परिसरातील कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. विशालदादा पाटील यांच्या प्रचार नियोजनाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली. विशालदादांना वातावरण चांगले आहे. यंदाची निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. कार्यकत्यांनी चिन्ह घरोघरी पोहचविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या.


यावेळी मदनभाऊ युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, माजी नगरसेवक संतोष पाटील, राजेश नाईक, चिंटू पवार, प्रितम रेवणकर, संजय शिकलगार, उदय मुरगुडे, विशाल घुगरे, आशिष कोरी, शुभम बनसोडे भूषण कर्नाव्ळे, सचिन घेवारे, पुरुषोत्तम भिंगे, मयूर बांगर, सुरेश सले, आकाश भोसले, अवधूत गवळी यांच्यासह गावाभागातील नागरिक उपस्थित होते.