सांगली समाचार - दि. २ एप्रिल २०२४
मुंबई - लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आता दोन गट पडले आहेत. काही आमदार, नगरसेवक यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारा यांना साथ दिलीय. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. राजकारण्यांपासून सर्वसामान्यांना त्यांच्या मतदार संघाच खासदार कोण होणार? याची उत्सुकता लागली आहे. पारावर, चहाच्या टपरीवर, ऑफिसच्या डेस्करवर होणाऱ्या चर्चांना उधाण आले आहे. याच लोकसभेचा अंदाज सांगणाऱ्या एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
जळगावच्या ज्योतिश्री संशोधन केंद्राच्यावतीने लोकसभा निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवणारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निवडणूक म्हटली म्हणजे अनेक लोक आपला अनुभव, अभ्यास,अवलोकन करुन कोण जिंकून येणार?, का जिंकून येणार? याबाबतचे अंदाज वर्तवत असतात. अगदी याच पध्दतीने या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या ज्योतिष अभ्यासकांना खालील प्रश्नांची उत्तरे बंद लिफाफ्यात 15 एप्रिलपर्यंत पाठवायची आहेत. उत्तरासोबत आपण आपले मत, विश्लेषण नोंदवले तरी ते चालणार आहे. हा लिफाफा ज्योतिष संशोधन केंद्राच्यावतीने 8 आणि 9 जून रोजी होणाऱ्या अधिवेशनात सर्वाच्या समोर खुला केला जाईल, त्यातील सर्वाधिक उत्तरे बरोबर देणारा "महाराष्ट्राचा मेदनीय रत्न" ठरणार आहे.
तुम्हाला द्यायची आहेत खालील प्रश्नांची उत्तरे
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा कोण जिंकणार ?
भाजप आघाडीचा 400 पारचा नारा खरा ठरेल का ?
काँग्रेस पक्षाला देशात किती जागा मिळतील ?
आप पक्षाला किती जागा मिळतील ?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पक्ष किती जागा जिंकेल ?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील ?
महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील ?
महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष कोण राहील ?
वर्ष 2026 मध्ये देशाचे पंतप्रधान कोण असतील ?
ही उत्तरे एका कागदावर लिहून एका बंद पाकिटात खालील पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
ॲस्ट्रोगुरू डॉ ज्योती जोशी
59, जोशी प्लाझा,
हाऊसिंग सोसायटी,
जळगाव 425001
महाराष्ट्र मेदनीय रत्ना"चं मानकरी बनण्याची संधी
2024 हे निवडणुकीचे वर्ष आहे. या वर्षात लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सर्वात आधी, म्हणजे मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होत आहे. लोकसभेच्या देशातील 543 मतदार संघातून खासदार निवडून दिले जाणार आहेत. भले निवडून 543 उमेदवार जातील, पण विविध पक्षांचे हजारो उमेदवार निवडणूक रिंगणात राहातील. आपल्याला देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरुन "महाराष्ट्र मेदनीय रत्ना"चं मानकरी बनण्याची संधी आहे.