सांगली समाचार - दि. ११ एप्रिल
सांगली - तासगाव तालुक्यातील कौलगे येथील एका महिलेला सरकारी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवरून नेऊन तिचे दागिने लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून त्याचे दोन गुन्हे हे उघडकीस आणत दागिने दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबी चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
विशाल कल्लाप्पा कांबळे (वय ४५, रा. चिंचोली, जिल्हा बेळगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. दिनांक 7 एप्रिल रोजी संशयित विषयाने कौलगे येथील शोभा कोरडे या महिलेस सरकारी अनुदान तसेच पेन्शन मिळून देतो असे सांगून त्यांना दुचाकीवरून नेले होते काही अंतरावर गेल्यानंतर विशालने कोरडे यांच्याकडे दागिने जबरदस्तीने काढून घेतले व तो तेथून पळून गेला. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारचे गुन्हे जत तालुक्यातील घडले होते त्यामुळे निरीक्षक शिंदे यांनी यातील संशोधना पकडण्यासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते.
पथक संशयतांचा शोध घेत असताना सांगलीतील शिवशंभू चौक ते करणार रस्ता परिसरात एक जण विना क्रमांकाची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने त्याचे जाऊन त्याला ताब्यात घेतले त्याची धरती घेतल्यानंतर त्याच्या खिशात दागिने आढळून आले त्याबाबत कसून चौकशी केल्या नंतर त्याने तालुके येथील महिलेची तसेच जत येथील विठ्ठल नगर येथील एका महिलेची फसवणूक केल्याची कबूल दिले अटक करून त्याच्याकडील दुचाकी दागिने असे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबी चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर लवटे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, अमर नरळे, उदय माळी, संदीप नलावडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.