yuva MAharashtra प्रगति आणि जिनविजय वर्धापन दिनानिमित्त . श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यान

प्रगति आणि जिनविजय वर्धापन दिनानिमित्त . श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यान



| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि.२८ एप्रिल २०२४
शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी साजरी करीत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेचे
‘प्रगति आणि जिनविजय’ या मुखपत्राच्या 119 व्या वर्धापन दिनानिमित्त दि.28 एप्रिल 2024 रोजी सायं. 5.30 वा. ‘भारताच्या सांस्कृतिक विकासामध्ये जैन धर्माचे योगदान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

पुणे येथील ख्यातनाम इतिहासतज्ञ, भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, शिक्षणतज्ञ व पुरातत्वज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे हे व्याख्यान देणार आहेत.
जयसिंगपूर महाविद्यालय जयसिंगपूरच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी द.भा.जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न रावसाहेब आ. पाटील (दादा) असतील.

भारताच्या इतिहासातील जैन धर्म, भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृतीच्या ठळक पाऊलखुणा यांचा प्रभावी वेध घेणारे
असे हे अभ्यासपूर्ण व्याख्यान असणार आहे.
गेली 118 वर्षे सातत्याने प्रगति आणि जिनविजय हे पाक्षिक प्रकाशित होत आहे. एका अत्यंत अभ्यासू आणि विषयाची योग्य मांडणी करणाऱ्या इतिहासतज्ञ डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे अशा विषयावर या भागात पहिल्यांदाच व्याख्यान संपन्न होत आहे. तरी या व्याख्यानाचा जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ‘प्रगति’ चे मुख्य संपादक डॉ. महावीर अक्कोळे व मुख्यमहामंत्री प्रकाशक डॉ. अजित ज. पाटील यांनी केली आहे.