सांगली समाचार - दि ९ एप्रिल २०२४
वॉशिग्टन - व्यापारी शिपिंग कंपनीत डेक पॅडेट म्हणून काम करणारा पुण्यातील तरुण शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. जेव्हा तो बेपत्ता झाला तेव्हा तो सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रवास करणाऱया टँकरवर तैनात होता.
दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱयांनी त्याच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली असून त्याला शोधण्यासाठी विविध सरकारी अधिकाऱयांची मदत घेत आहेत. वारजे परिसरात राहणारा प्रणव गोपाळ कराड (वय 22) सहा महिन्यांपासून मुंबईतील विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट इंडिया पंपनीत नोकरीला आहे. त्याने एमआयटी, पुणे येथून नॉटिकल सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तो अमेरिकेतील पंपनी विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंटमध्ये काम करत होता.