yuva MAharashtra विरप्पन कन्येने केला 'याचा' त्याग

विरप्पन कन्येने केला 'याचा' त्याग



| सांगली समाचार वृत्त |
चेन्नई, दि.१४ एप्रिल २०२४ - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तामिळनाडूत कमळ फुलवण्याचा प्रयत्न करणाया भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. कुख्यात तस्कर विरप्पनची कन्या आणि भाजपा नेत्या विद्या रानी यांनी भाजपाची साथ सोडली आहे. त्यांनी एनटीके अर्थात नाम तमिलर काची या पक्षात प्रवेश केला आहे. एनटीकेने विद्या रानी यांना कृष्णगिरी येथून मैदानात उतरवले आहे.


विद्या रानी या भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, त्यांनी तिकिटासाठीच पक्ष बदलला आणि एनटीकेने हीच संधी साधून त्यांना उमेदवारी दिली. दक्षिण हिंदुस्थानात पाय रोवण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपाला विद्या रानी यांनी साथ सोडल्यामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागू शकते, असे राजकीय तज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, कृष्णगिरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला असून ही जागा जिंकून आणणे भाजपासाठी आणखी कठीण होऊन बसल्याचेच
दिसत आहे.