सांगली समाचार- दि. ५ एप्रिल २०२४
मा पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवैयरित्या गोवंश जनावरे कत्तली करीता वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार मा. संदिप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, मा. मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग इस्लामपूर, सतिश शिंदे पोलीस निरीक्षक स्था.गु.अ.शाखा सांगली, प्रदिप सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली ती खालील प्रमाणे-
आज दि.०४/०४/२०२४ रोजी पेठनाका परिसरमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पेठ गांवचे हद्दीत दयानंद अकॅडमीचे समारे एका ठिकाणी अवैद्यरित्या गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने ठेवलेली असून टॅम्पो मार्फत वाहतूक करीत आहेत. अशा मिळाले माहितीवरुन इस्लामपूर पोलीस ठाणेकडील सपोनि माने, पोउपनि गायकवाड, पोहेकॉ / ८१९ ठोंबरे, पोहेकॉ / हांडे, पोहेकॉ/३८३ प्रदिप पाटील, पोशि/०८ जाधव, चालक पोशि/शिंदे यांनी छापा टाकला असता त्याठिकाणी एका शेडमध्ये व बाजूला असलेल्या टाटा टेम्पो क्र एमएच-४३ ई-२४५० मध्ये अशी मिळून एकुण ३४ गोवंश जातीची जनावरे मिळून आली. सदर जनावरे ही आरोपी सचिन निवास साळूखे रा पेठनाका ता वाळवा जि सांगली याची असून त्याला टेम्पो चालक सचिन विनोद वारे रा आष्टा ता वाळवा जि सांगली यांना ताब्यात घेणेत आले आहेत. सदर गोवंश जातीची जनावरे ही पत्र्याचे शेडमध्ये व टेम्पो वाहनामध्ये दाटीवाटीने जखडून ठेवून त्यांना चारा पाणी न देता त्यांची कत्तल करण्याचे उद्देशाने ठेवलेली एकुण ३४ गोवंश जनावरे मिळून आलेली आहेत. अशी २४ लाख ३५ हजार किंमतीची गोवंश जनावरे व टेम्पो वाहन मिळून आले आहेत.
तसेच दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचेकडील सपोनि/सिकंदर वर्धन, पोहेकॉ/१७६९ खोत, पोहवा /१७३३ पाटील, पोना /९८७ सोमनाथ गुंडे, पोशि/४८७ रोहन घस्ते, पोशि/१३४ अजय बेंद्रे, पोशि/१८६२ सुनिल जाधव यांचे पथकाकडून जनावरे वाहतूक करणारा संशईत टेम्पो क्र- एमएच १० सीआर७०५६ ताब्यात घेतला असता. त्यामध्ये गोवंश जातीचे एकुण ७ जनावरे दाटीवाटीने भरुन त्यांना जखडून ठेवून त्यांना चारा पाणी न देता त्यांची कत्तल करण्याचे उद्देशाने अवैद्य वाहतूक करताना मिळून आले. सदरची जनावरे ही आरोपी सचिन निवास साळुंखे रा पेठनाका ता वाळवा जि सांगली यांचे मालकीची असले बाबत वाहनाचा चालक आरोपी उमेश ऊर्फ राजू बापुसाो धुमाळ रा- धुमाळवाडी ता शिराळा जि सांगली व मदतनिस दिलीप महादेव गायकवाड रा शिराळा ता शिराळा जि- सांगली यांनी कबूल केले आहे. सदर कारवाईमध्ये ७ गोवंश जातीची जनावरे व टेम्पो यांची एकुण किंमत १७ लाख ७५ हजार किंमतीची गोवंश जनावरे व टेम्पो वाहन मिळून आले आहेत.
अशा प्रकारे इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत आज रोजी इस्लामपूर पोलीस ठाणे व स्था. गु. शाखा सांगली यांनी केलेल्या कारवाईत एकुण किंमत ४२ लाख १० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केलेला असून एकुण ४ आरोपी ताब्यात घेतलेले असून सदरचा गुन्हे दाखल करुन पुढील कारवाई करीत आहे. यातील आरोपी सचिन निवास साळुंखे रा पेठनाका ता वाळवा याचेवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.