yuva MAharashtra काळ आला होता पण वेळ आली नव्हती; चालती बस पेटली आणि...

काळ आला होता पण वेळ आली नव्हती; चालती बस पेटली आणि...



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि.२८ एप्रिल २०२४
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज मोठी दुर्घटना टळली आहे. खाजगी बसने टायर फुटल्याने अचानक पेट घेतला. या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. आढे गावच्या हद्दीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बसने अचानक पेट घेतल्याने अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवलं त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आहे, सगळे प्रवासी सुखरुप आहे. आगीवर अग्निशमन दल आणि यंत्रणेने नियंत्रण मिळवले.


सकाळी साडेसात वाजता आढेगावच्या हद्दीत साडे सातच्या दरम्यान खासगी बसचा टायर फुटला. त्यामुळे बस जागेवरच पेटली. त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्यानं संपूर्ण बसने पेट घेतला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. टायर फुटल्याची माहिती मिळताच बस चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि सगळ्या प्रवाशांना बसमधून उतवरून दिलं. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने सगळे प्रवासी सुखरुप बचावले. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवली गेली.

मोठी दुर्घटना टळली...

बसचा अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना झाली असती. अनेक प्रवासी दगावण्याची भीती होती. त्यात सर्व वयोगटातील प्रवाशांचा समावेश होता. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि मोठा अपघात टळला.