yuva MAharashtra कडूसच्या दक्षणा फौंडेशनमधील विद्यार्थ्यांना विषबाधा; सुमारे शंभर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

कडूसच्या दक्षणा फौंडेशनमधील विद्यार्थ्यांना विषबाधा; सुमारे शंभर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू



| सांगली समाचार वृत्त |
खेड - दि.२१ एप्रिल २०२४
कडूस (ता.खेड) : येथील दक्षणा फाउंडेशन मधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. सुमारे शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावलेली असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

दक्षणा फाउंडेशन ही सेवाभावी आणि गैरसरकरी संस्था आहे. ही संस्था ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल परंतु अभ्यासातील हुशार विद्यार्थ्यांना आयआयटी व मेडिकल एन्ट्रान्सच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते. देशभरातून विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. 


सध्या येथे सुमारे तीनशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.१९) रात्री पासून जुलाब, तीव्र डोकेदुखी व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांचा त्रास वाढल्याने उपचारासाठी त्यांना कडूसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर चांडोली येथील ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.