yuva MAharashtra टेलिकॉम मंत्र्यालयाचा मोठा निर्णय, १५ एप्रिलपासून होणार 'ही' सेवा बंद

टेलिकॉम मंत्र्यालयाचा मोठा निर्णय, १५ एप्रिलपासून होणार 'ही' सेवा बंद



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - भारतामध्ये मागील अनेक वर्षांपासून 'सायबर क्राइम' संदर्भात गुन्हे घडत आहेत. त्यात 'कॉल फॉरवर्डिंग स्कॅम'मध्ये वाढ झाली आहे. त्यात 'कॉल फॉरवर्डिंग स्कॅम'मध्ये वाढ झाली आहे. या सगळ्यावर आळा घालण्यासाठी टेलिकॉम मंत्र्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम मंत्र्यालयाने घेतलेल्या निर्णयानुसार, १५ एप्रिल २०२४ पासून देशभरात USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा तात्पुरत्या स्थगित केला जाणार आहे.

सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या USSD-based कॉल फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचना येईपर्यंत रद्द करण्यात येणार आहे. या संदर्भात टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले आहेत, असे टेलिकॉम मंत्र्यालयाकडून आदेश देण्यात आले. त्यामुळे ही सेवा कायमची न बंद करता तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, असे टेलिकॉम मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कॉल फॉरवर्डिंग म्हणजे काय ?

कॉल फॉरवर्डिंग ही सेवा सुरु झाल्यानंतर तुम्हाला एका नंबर वरून आलेला कॉल तुम्ही दुसऱ्या नंबर वर पुढे पाठवू शकता. या प्रकारे तुम्ही मेसेज देखील समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता. आपल्या नंबरला काही वेळेस नेटवर्क नसते अश्यावेळी ही सेवा खूप फायदेशीर आहे. यामुळे मेसेज किंवा कॉल मिस होणार नाही. मात्र अनेकदा याचा वापर चुकीचा कामासाठी केला जातो. कॉल फॉरवर्डिंगद्वारे सध्या फसवणूक देखील होत आहे. त्यामुळे हा महत्वाचा निर्णय टेलिकॉम मंत्र्यालयाकडून घेण्यात आला आहे.


कॉल फॉरवर्डिंगचा वापर करून कसे फसवले जाते ?

तुम्हाला तुमच्या फोन नंबरवरून कॉल करून तुमच्या सिमकार्ड सर्व्हिस प्रोव्हाईडरचे कस्टमर केअर कर्मचारी असल्याचे सांगितले जाते. सिमकार्डमध्ये काही बिघाड झाला आहे, नेटवर्क आणि सर्व्हिस क्वालिटी खराब झाली आहे असे सांगितले जाते. समस्या सोडवण्यासाठी स्कॅमर तुम्हाला एक कोड एंटर करायला सांगतात. सांगण्यात आलेला हा कोड *401# या प्रकारे असतो.
तुमच्या सिमवर येणारे सर्व कॉल आणि मेसेज तुम्ही एंटर केलेल्या नंबरवर फॉरवर्ड केले जातात. अशा प्रकारे कॉल फॉरवर्डिंग करून महत्त्वाचे ओटीपी किंवा टेक्स्ट मेसेजवर येणारे पासवर्ड नंबरवर फॉरवर्डिंग केले जातात.