yuva MAharashtra भारताच्या राजदूत देवयानी खोब्रोगडे यांनी केला 'अप्सरा'चा पोशाष परिधान, फणस का ?

भारताच्या राजदूत देवयानी खोब्रोगडे यांनी केला 'अप्सरा'चा पोशाष परिधान, फणस का ?



| सांगली समाचार वृत्त |
नोम पेन्ह - दि.१५ एप्रिल २०२४ -
भारतीय राजदूत हे दोन देशांमध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावत असतात यासाठी त्यांना तेथील परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते त्या देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांबरोबरच राजकीय पक्ष व जनतेशीही जवळीक साधावे लागते आणि मग संबंधित देशाच्या पारंपारिक सणाच्या निमित्ताने ही संधी या राजनैतिक अधिकाऱ्यांना चालू नेते असाच प्रसंग घडला कंबोडिया मध्ये तेथील भारतीय राजदूत देवयानी खोब्रागडे यांनी अप्सरेचा वेश परिधान केला. कारण होते कंबोडियन वर्ष दिनाचे. यासाठी खोब्रागडे यांनी अप्सराचा वेश परिधान केला होता.


कंबोडियातील भारतीय दूतावासाने अलीकडेच भारताच्या राजदूत देवयानी खोब्रोगडे यांच्या पारंपारिक कंबोडियन पोशाखातील फोटोशूटमधील प्रतिमा शेअर केल्या आहेत. ज्यात त्यांनी 'अप्सरा' म्हणून पोशाख केला आहे. ख्मेर नववर्षानिमित्त कंबोडियन लोकांना शुभेच्छा देण्यासाठी देवयानी खोब्रोगडे यांनीन 'ख्मेर अप्सरा' म्हणून वेषभूषा केली. राजदूत देवयानी खोब्रागडे यांना ख्मेर संस्कृती आणि परंपरेबद्दल खूप कौतुक आहे. ख्मेर नववर्षाच्या भावनेला अंगीकारून, त्यांनी ख्मेर अप्सरा म्हणून सुरेख वेषभूषा केली. दूतावासाने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिलं आहे की, 'आमच्या सभ्यतेच्या समृद्ध बंधनाला मूर्त रूप धारण केले. आमच्या सर्व कंबोडिया मित्रांना ख्मेर नववर्षाच्या आनंददायी उत्सवाच्या शुभेच्छा.'

फोटोंमध्ये देवयानी खोब्रागडे पारंपारिक कंबोडियन पोशाखात दिसत आहे. त्यांनी पारंपारिक सोन्याचे दागिने आणि हेडगियर सोबत पारंपारिक ख्मेर सॅम्पोट, एक प्रकारचा लपेटलेला स्कर्ट घातलेला आहे.