लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था रहावी या हेतूने शासनाने सीमारेषेवर चेकपोस्ट उभा केले आहेत. आज बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक (MH 10 CR 0641) गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरज कडे येत होती. यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती. यावेळी पोलीस नाईक प्रविण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास ११ लाख ६० हजार रुपये किंमतीचा गुटखा सापडला. स्थिर सव्हक्षण पथकाचे पथकप्रमुख महेशकुमार लांडे, सुनील कोरे, राँकेश शिंदे, राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले, भारत पवार, यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.
म्हैसाळ चेकपोस्टवर १६ लाखांचा गुटखा जप्त, एकजण ताब्यात
April 17, 2024
| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४
मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्ट जवळ स्थिर सव्हक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत १६ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा, गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख (वय २८)रा.सांगली याला मिरज ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले.