| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२४ एप्रिल २०२४
जागतिक तापमानवाढीचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. इस्रोने सोमवारी वाढत्या हिमनद्या (ग्लेशिअर) आणि हिम सरोवरांच्या (ग्लेशिअस लेक) बाबतीत धोक्याची घंटा वाजवली. इस्रोने हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत असल्याच्या उपग्रह प्रतिमा जारी केल्या. तसेच हिम सरोवरांचा आकारही दुपटीने वाढत असल्याचा दावा केला. हे पर्यावरण संकट टाळण्यासाठी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे इस्रोने स्पष्ट केले. इस्रोने 1984 ते 2023 या कालावधीतील हिंदुस्थानच्या हिमालयीन प्रदेशातील नदीखोऱयाच्या पाणलोट क्षेत्रांचे उपग्रह पह्टो घेतले आहेत. या तीन ते चार दशकांच्या उपग्रह डेटा संग्रहातून हिमनद्यांच्या वातावरणात होणाऱया बदलांबद्दल धक्कादायक माहिती मिळाली आहे. या पह्टोंमध्ये हिम सरोवरांमध्ये लक्षणीय बदल दिसून येतोय. अहवालानुसार, 671 हिम सरोवरांचा दुप्पट विस्तार झालाय. 10 हेक्टरपेक्षा मोठय़ा असलेल्या 2 हजार 431 सरोवरांपैकी 676 हिमनदी आणि हिम सरोवरांचा विस्तार झाला आहे.
गेपांगघाट हिमनदी तलावाचा विस्तार
इस्रोच्या उपग्रह प्रतिमांवरून, हिमाचल प्रदेशातील 4,068 मीटर उंचीवर असलेल्या गेपांग घाट हिमनदी तलावाचा 178 टक्के विस्तार दिसून येतोय. 1989 ते 2022 दरम्यान 36.49 हेक्टरवरून 101.30 हेक्टरपर्यंत तलावाचा विस्तार झालाय. म्हणजेच दरवर्षी सुमारे 1.96 हेक्टरची वाढ झाली आहे.
601 हिम सरोवरांमध्ये दुप्पटवाढ
676 सरोवरांपैकी 601 सरोवरांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर 10 तलावांमध्ये दीड ते दोन पटीने वाढ आहे. 65 तलावांमध्ये 1.5 पटीने वाढ झाली. 676 हिम सरोवरांपैकी 130 हिंदुस्थानात आहेत, ज्यात 65 सिंधू, सात गंगा आणि 58 ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱयात आहेत. 314 हिम सरोवर 4 ते 5 हजार मीटर उंचीवर आहेत, तर 296 सरोवर 5 हजार मीटरपेक्षा जास्त आहेत.