| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२५ एप्रिल २०२४
गावात प्रत्येकाच्या शेतात म्हसोबा असतो. तो शेताची राखण करतो, त्यामुळे तुम्ही वर्षाला परडी सोडता. तुमच्या शेतातला म्हसोबा मीच आहे असे विधान राजू शेट्टी यांनी केले आहे. म्हसोबा तुमच्या ऊसाची राखण करतो, मी सुद्धा तुमच्या ऊसाची राखण करतो, त्यामुळे मला मत द्या असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. मला निवडणूक लढण्यासाठी जनता पैसे देते, ज्या दिवशी जनता मला पैसे देणार नाही, त्यादिवशी मी निवडणूक लढवणार नाही असेही शेट्टी म्हणाले.
दरम्यान राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आत्ता कणंगले लोकसभा मतदारसंघात जरी बहुरंगी लढत असले तरी, राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम केले आहे, रक्त सांडले आहे त्याची तोड कशानेच होणार नाही. आणि ही जाणीव शेतकऱ्यांना हे आहे.
एकीकडे शेतकऱ्यांची ही बाजू भक्कम होत असतानाच दुसरीकडे जातीय मतांचे राजकारण हे खेळले जात आहे. परंतु यातही राजू शेट्टी यांनी बाजी मारल्याचे जाणवते. कारण गेल्या 20 30 वर्षात राजू शेट्टी यांनी पतीचे राजकारण न करता केवळ शेतकऱ्यांसाठी, शेत भावाच्या हितासाठी आपला लढा धगधगत ठेवला आहे. परिणामी ऊस दर असो, दूध दर असो किंवा इतर पिकांचे दर असत शेतकऱ्यांना राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा फायदाच झाला आहे. आणि म्हणूनच शेतकरी एक संघपणे जातीय अथवा इतर कुठल्या आमिषाला बळी न पडता राजू शेट्टी यांच्या पाठीमागे उभा असल्याचे दिसत आहे. म्हणूनच या बहुरंगी लढते राजू शेट्टी यांचा विजय नक्की असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.