yuva MAharashtra सलमान खान मुंबई सोडणार?; 'या' ठिकाणी होणार शिफ्ट !

सलमान खान मुंबई सोडणार?; 'या' ठिकाणी होणार शिफ्ट !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२ एप्रिल २०२४
14 एप्रिलला पहाटे एक हैराण करणारी घटना घडली. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांच्या निशाण्यावर सलमान खानच्या घराची बाल्कनी होती. हेच नाही तर ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. या गोळीबारानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले.

गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार सलमान खान हा पनवेलच्या फार्म हाऊसवर शिफ्ट होणार आहे. सलमान खान हा जास्तीत जास्त वेळ पनवेलच्या फार्म हाऊसवर घालवतो आणि त्याला तिथे राहण्यासाठी अधिक आवडते. गॅलेक्सी अपार्टमेंटपेक्षा अधिक सुरक्षा पनवेलच्या फार्म हाऊसवर असल्याचे सांगितले जाते. 

दरम्यान काही दिवसापूर्वी सलमान हा त्याच्या खाजगी अंगरक्षकासह दुबई येथे गेला होता. त्याचा हा दौरा एका कार्यक्रमासाठी असल्याचे सांगितले गेले तरी, त्यामध्ये अन्य काही कारण आहे का ? सलमानच्या घरावर हल्ला करण्यामध्ये बिष्णोई टोळीचा हात असल्याने अशी चर्चा सुरू आहे. आणि यापुढे बिष्णोई याचा त्रास रोखण्यासाठी तर हा दौरा नव्हता ना अशी चर्चा सुरू आहे ?