सांगली समाचार - दि. २ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - जगाच्या पाठीवर अनेक अनोखे खड्डे, विवरे Gravity Hole आहेत. केवळ जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही अशा गूढ पोकळ्या आढळून येतात. विशेष म्हणजे हिंदी महासागरातही असाच एक खड्डा आहे जो लाखो वर्षांपूर्वी बनलेला आहे. या खड्ड्याला ग्रॅव्हिटी होल असं नाव देण्यात आलेले आहे. अथांग महासागराच्या मधोमध तयार झालेल्या या खड्ड्याला 'नरकाचा दरवाजा' असेही म्हटले जात होते. 'गॅ्रव्हिटी होल' ही हिंद महासागरात निर्माण झालेली अनोखी रचना आहे. या भागात गुरुत्वाकर्षण इतके कमी आहे की पाण्याचा स्तर 328 फूट खाली गेला आहे. त्यामुळेच समुद्रात हा महाकाय खड्डा बनला आहे.
संशोधकांच्या एका टीमने म्हटले आहे की, पृथ्वीच्या भूगर्भात असलेल्या लाव्हामुळे हा खड्डा निर्माण झाला आहे. संशोधकांच्या एका पथकाने या रहस्याची उकल करण्यासाठी सुपर कॉम्प्युटरचा वापर केला आहे. यातून मिळालेल्या गणनेवरून सिद्ध झाले आहे की समुद्रातील हा खड्डा तब्बल 14 कोटी वर्षांपूर्वीच निर्माण झाला आहे. अभ्यासात सापडलेले परिणाम जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. संशोधकांनुसार, एका प्राचीन महासागरामुळे ही संरचना तयार झाली होती; मात्र तो महासागर आता अस्तित्वात नाही. 1948मध्ये हा विशालकाय खड्ड्याच्या शोध लागला होता. तेव्हापासून याचे गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील होते. त्यांना आता कित्येक वर्षांनंतर यश मिळाले.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे गूढ आतापर्यंत सोडवले गेले नाही कारण याकडे भौतिकशास्त्राच्या नियमाच्या आधारे पाहिले जात होते. पाच सुपर कॉम्प्युटरचा वापर करूनच शास्त्रज्ञांनी गेल्या 140 दशलक्ष वर्षांत या ठिकाणी टेक्टोनिक प्लेटची हालचाल झाली होती, हे शोधून काढले आहे. या माध्यमातून शास्त्रज्ञांना आढळले की, गुरुत्वाकर्षणामुळे लो डेन्सिटी प्लाज्मा प्लूम्स या ग्रेव्हिटी होलच्या Gravity Hole खालील भागातून बाहेर येत आहेत.
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, करोडो वर्षांपूर्वी भारत कधीतरी आफ्रिका खंडाचा एक भाग होता. मात्र कालांतराने तो वेगळा होऊन युरेशियन टेक्टोनिक प्लेटच्या दिशेने सरकला. हा भाग पुढे सरकत असतानाच प्राचीन टेथिस समुद्राचा सागरी तळ आच्छादनाखाली येऊ लागला. अशा प्रकारे हिंदी महासागर Gravity Hole तयार होऊ लागला. नंतर टेथिसची समुद्र पातळी वितळू लागली. कोट्यवधी वर्षांपासून साचत असलेल्या उच्च घनतेच्या आवरणाच्या वितळल्यामुळे कमी घनतेचे प्लाझ्मा प्लम्स बाहेर येऊ लागले. यामुळेच याच्या खालच्या भागात जगातील इतर समुद्रासारखी घनता नाही आणि येथील पाण्याची पातळी इतर ठिकाणांपेक्षा कमी झाली आहे.