हे इंद्रधनुष्य गोलाकार असते. ते आपल्याला पूर्ण दिसत नाही. कारण त्याचा अर्धा भाग हा जमीनीवर आणि अर्धा भाग हा आकाशात असतो. आपल्याला आकाशातला भाग दिसतो. त्यामुळे आपल्याला इंद्रधनुष्य हे अर्धवर्तुळाकार जास्त दिसते. ऊन पाऊस यांचे मिलन जितका वेळ जास्त राहील तेवढं इंद्रधनुष्य हे गडद दिसते आणि नंतर पावसाची तीव्रता कमी झाली की मग हळूहळू आकाशातील इंद्रधनुष्यही फिकट होत जाते आणि मग त्यानंतर ते नाहीसे होते. त्यावेळी म्हणजे इंद्रधनुष्य नाहीशी होण्याची प्रक्रिया पाहणेही रोमांचक असते, हळूहळू त्याचा पट्टा हा धुसर होत जातो आणि ही गायब होते. सप्तरंगी म्हणजेच तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, नारंगी, पांढरा, जांभळा असे रंग इंद्रधनुष्यात असतात. हे रंग अगदी योग्य पट्टीत गोलाकार दिसतात. हे इंद्रधनुष्य परफेक्ट गोलाकार बनते, चमत्कारच नाही?
इंद्रधनुष्य वर्तुळाकारच का असते? त्याचा अर्धा भाग आपल्याला का दिसत नाही...
April 24, 2024
| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२४ एप्रिल २०२४
इंद्रधनुष्य म्हणजे या धरतीवरील एक वेगळीच किमया आहे. जेव्हा ही घटना आपण डोळ्यांनी पाहतो तेव्हा आपल्यालाही अप्रुप वाटल्याशिवाय राहत नाही. परंतु नक्की इंद्रधनुष्य तयार होते तरी कसे ? याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यामुळे आपण या लेखातून त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जेव्हा आकाशात दाट काळे ढग जमा होतात. तेव्हा सूर्यप्रकाश आपल्याला दिसत नाही त्यातून आपण तो पाहूही शकत नाही. परंतु जेव्हा मान्सून पुढे पुढे सरायला लागतो तेव्हा मग हळूहळू सूर्य वर येतो आणि आपल्याला ऊनपाऊस असा संगम पाहायला मिळतो. तेव्हा आपल्याला आकाशात सत्परंगी असे इंद्रधनुष्य दिसते.
इंद्रधनुष्य कसे तयार होते?
जेव्हा पाऊस पडत असताना उनही असते. तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते. जेव्हा सूर्याची किरणे ही पावसातून परावर्तित होतात तेव्हा त्याच्या समोरील भागावर म्हणजेच विरूद्ध भागावर इंद्रधनुष्य तयार होते. जेव्हा उन पाऊस असा संगम असेल तेव्हा सूर्याच्या विरूद्ध बाजूला इंद्रधनुष्य पाहावे.
इंद्रधनुष्य हे गोलाकारच का असते?
इंद्रधनुष्य गोलाकार असण्यामागे फार मोठे विज्ञान आहे, हा एकप्रकारे विज्ञानाचा चमत्कारच आहे. खरंतर हे विज्ञान भौतिकशास्त्रात येते. त्यामागे फार मोठे भौतिकशास्त्र (Physics) आहे. आपल्या पृथ्वीवरील बरेचसे विज्ञान हे परावर्तन, प्रकाशाचे आहे. भौतिकशास्त्रात परावर्तनाचे विज्ञान असते. सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही ही शिकवले जाते. जेव्हा पावसाच्या थेंबातून सूर्यकिरणे परावर्तित होतात तेव्हा ती 42 डिग्री इतकी असते. तेव्हा गोलाकार पावसाच्या थेंबातून सूर्यकिरणे परावर्तित होतात म्हणून इंद्रधनुष्य हे गोलाकार दिसते. जसे पाणी ज्या डब्यात असेल त्याचा आकार घेते काहीसे त्याचप्रमाणे किरणे ज्याच्या आकारातून परावर्तित होतात त्यातून दिसणारा प्रकाश त्या आकाराचा असतो, यामागे विशिष्ट विज्ञान आहे.