| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२१ एप्रिल २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरु आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाहांचा व्हिडीओ दाखवला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर कारवाई का नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे आणखी विचारणा केली होती, पण त्यावर उत्तर आलेलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. मशाल गीतात "भवानी" शब्द आल्याने निवडणूक आयोगाने नोटीस पाठवत हा शब्द हटवण्यास सांगितलं आहे. या संदर्भात आज उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मशाल गीतातील "भवानी" शब्द हटवणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. आमचं सरकार आणल्यावर प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत करु, असं अमित शाह म्हणाले. बजरंग बलीचं नाव घेत पंतप्रधान मोदींनी प्रचार केला. हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या मोदी-शाहांवर आधी कारवाई करा, असं उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून म्हटलं आहे.