| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४
कार्यकर्त्यांनी एकदा एखाद्या नेत्यावर जीव लावला की ते त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात असाच प्रसंग काल सांगलीकरांना पहावयास मिळाला प्रसंग विशाल पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या आणि रागापोटी विशाल पाटील आणि दादा घराण्यावर नितांत प्रेम असणारा कार्यकर्ता भर उन्हात उत्साहाने विशाल दादांच्या पाठीशी राहिल्याचे दिसून आले. रखरखत्या उन्हातही प्रचार फेरी व मेळाव्यासाठी जिल्हाभरातून हजारो लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. जनतेच्या स्वाभिमानासाठी विशाल पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.
येथील गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली. विशाल पाटील म्हणाले, मलाच एबी फॉर्म निश्चित मिळणार. आता निर्णय त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांनी माघार घ्यायची आहे. आम्ही कामाला लागलो आहोत. दोन काँग्रेसकडून आणि एक अपक्ष अर्ज आतापर्यंत भरला आहे. आणखी एक अर्ज भरणार आहे. महाविकास आघाडीने सांगलीतील उमेदवारी बदलावी.
गणपती मंदिरापासून ते अगदी काँग्रेस कमिटी जवळील मेळावा संपेपर्यंत हे कार्यकर्ते विशाल दादांसाठी घामठा करणाऱ्या भर उन्हात दादांसोबत असल्याचे दिसून आले. या मिरवणुकीबाबत, दादांच्या कार्यकर्त्याबाबत आणि बंडाबाबतचाच विषय काल दिवसभर व आज सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात किंबहुना संपूर्ण राज्यात दिसून येत होता.