| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० एप्रिल २०२४
गेल्या पाच वर्षात विरोधक म्हणून विशाल पाटील यांनी जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर आंदोलन केले नाही. प्रशासनाला एखादे निवेदनही दिले नाही. ज्यांना विरोधकाची भूमिका निभावता येत नाही, ते खासदार कसे होऊ शकतात, असा सवाल भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, इतकी वर्षे
संजयकाकांचा विशाल पाटील यांच्यावर हल्लाबोल
ज्या घरात खासदारकी होती, त्यांच्यावर अन्याय कसा झाला, याचेही उत्तर त्यांनी द्यावे. विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नावर भांडायचे असते. मात्र, विशाल पाटील यांनी गेल्या पाच वर्षात स्वतःहून एक आंदोलन केले नाही. कृष्णा नदी कोरडी पडली, सिंचन योजनांचा प्रश्न निर्माण झाला. कोरोना आला, महापूर आला अशा कोणत्याही संकटात कधी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवल नाही. प्रशासनाकडे साधे निवेदन द्यायलाही ते गेले नाहीत. त्यामुळे विरोधक म्हणून काय करायचे असते हेच ज्यांना माहिती नाही, त्यांना खासदारकी हवी आहे.
विशाल पाटील यांच्या घरात ३५ वर्षे खासदारकी होती, या ३५ वर्षातील विकास कामाचा हिशोब द्यावा, नंतर आमची मापे काढावीत. असे संजयकाका यांनी म्हटले आहे.