Sangli Samachar

The Janshakti News

जगातील पहिलं सोन्याचं हॉटेल; एका रुमचं भाडं किती?



सांगली समाचार - दि.  २ एप्रिल २०२४
मुंबई  -  जगभरात एकापेक्षा एक हॉटेल आहे. प्रत्येक हॉटेलची एक वेगळी ओळख असते. जगातील असंच एक हॉटेल आहे, त्या हॉटेलला सोन्याचा मुलामा चढविण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर टॉयलेट, बाथ टबलाही सोन्याचा मुलामा चढविण्यात आला आहे. या हॉटेलविषयी माहिती जाणून घेऊयात.

कॉफीच्या कपावर सोन्याचा मुलामा

सोन्याचं हॉटेल हे व्हिएतनाममध्ये आहे. 'डोल्से हनोई गोल्डन लेक' असं या हॉटेलचं नाव आहे. हॉटेल बांधण्यासाठी २०० मिलियन डॉलरचा खर्च आला आहे. लॉबीमध्ये २४-कॅरेट प्लेटिंग, कटलरी, शॉवर हेड आणि टॉयलेट सीटवर देखील सोन्याचा मुलामा चढविण्यात आला आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सोन्याचा कपमध्ये चहा दिला जातो.

हनोई शहरातील २५ मजली 'डोल्से हनोई गोल्डन लेक' हॉटेलमधील भोजनामध्ये रहस्यमय सोन्याचा पदार्थ मिसळून जेवण दिलं जातं, अशी माहिती मिळत आहे. हॉटेलमध्ये एकूण ४४१ खोल्या आहेत. हॉटेल हे शहरातील प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमधील एका रुमचं बुकिंग २५० डॉलर प्रति रात्री याने सुरु होते.



हॉटेलचे मालक होआ बिन्ह ग्रुपचे चेअरमॅन गुयेन हुआ डुऔंग यांनी सांगितलं की, या हॉटेल सारखं कोणतंही दुसरं हॉटेल नाही. हे हॉटेल सजविण्यासाठी एक टन सोन्याचा वापर करण्यात आला. आमची सोन्याचा मुलाम्याची फॅक्टरी असल्याने सजावटीसाठी खर्च कमी आला. यामुळे कमी खर्चात हॉटेलमध्ये चांगली सजावट करता आली'. तत्पूर्वी, हॉटेल बांधण्यासाठी एकूण ११ वर्ष लागले. टॉयलेट सीट, बाथ टबलाही सोन्याचा मुलामा चढविण्यात आल्याने या हॉटेलची लोकांमध्ये खूप चर्चा असते. हॉटेलच्या बाहेरील बाजूलाही गोल्डन रंगाने रंगवलं आहे.