| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.१६ एप्रिल २०२४
आधुनिकीकरणाच्या युगातील बदल स्वीकारत सत्ताधारी होण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार आता प्रत्यक्ष निवडणूक प्रचारापेक्षा डिजिटल प्रचारावर भर देत आहेत. त्यामुळेच या लोकसभा निवडणुकीत ढोल-ताशांच्या दणदणाटापेक्षा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणूक प्रचार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
डिजिटल निवडणूक प्रचाराच्या संदर्भात, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला 29 मार्चपासून 279 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये भाजपने सर्वाधिक अर्ज दिले आहेत. काँग्रेस दुसऱ्या तर आम आदमी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भाजपने आतापर्यंत सर्वाधिक 200 अर्ज दिले आहेत. काँग्रेसने 78 तर 'आप'ने एकच अर्ज दिला आहे. MCMC (मीडिया प्रमाणन आणि देखरेख समिती) अर्ज दाखल केल्यापासून 48 तासांच्या आत त्याला मंजूरी द्यावी लागते.
डिजिटल निवडणूक प्रचारासाठी व्हिडिओ, रील, भाषणे इत्यादी प्रसारित करण्यापूर्वी, ते निवडणूक आयोगाच्या MCMC द्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना अर्ज करावा लागतो. 48 तासांत ते मंजूर केले जातात. सध्या प्राप्त झालेल्या अर्जांपैकी बहुतांश अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
'निपाणीसह सात मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळींना मताधिक्य देणार'; अखेर उत्तम पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा जाहीर
निवडणूक प्रचारात एआय चा वापर
देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्ष विविध नव्या गोष्टींचा अवलंब करत आहेत. दरम्यान, तमिळनाडूच्या धर्मपुरी येथे रोबोट निवडणुकीचा प्रचार करत असल्याचे समोर आले आहे.
धर्मपुरी लोकसभा मतदारसंघातील AIADMK उमेदवार डॉ. अशोकन निवडणूक प्रचारासाठी रोबोटची मदत घेत आहेत. हा रोबो लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. लोक त्याच्या जवळ येऊन कुतूहलाने बघत आहेत. लोक या रोबोटच्या प्रचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हारल होत आहेत.