yuva MAharashtra पुत्रासाठी शैलजाभाभी पाटील लोकसभा रणांगणात; तासगाव तालुक्यात गावभेटीवर भर

पुत्रासाठी शैलजाभाभी पाटील लोकसभा रणांगणात; तासगाव तालुक्यात गावभेटीवर भर



| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि.२२ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीमती शैलजाभाभी प्रकाशबापू पाटील यांनी तासगाव तालुक्यातील गावांना भेट देत मतदारांशी संवाद साधला. जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी विशालदादा पाटील यांना साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले. या गावभेटीवेळी महिला, ज्येष्ठ नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीमती पाटील यांनी हातनूर येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी मोहनअण्णा पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन पाटील, उपसरपंच प्रभावती पाटील, अंकुश पाटील उपस्थित होते. हातनोली येथे बाजार समितीचे माजी सभापती अजित जाधव यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. विसापूर भेटीवेळी सूतगिरणीचे माजी चेअरमन पंतगबापू माने पाटील, वसंतदादा कारखान्याचे संचालक संपतदादा माने, काँग्रेसचे सरचिटणीस महादेव माने उपस्थित होते. आरपीआयचे नेते प्रमोद अमृतसागर, उपसरपंच अशोक अमृतसागर, पंकजा अमृतसागर, पाडळी येथील संतोष यादव, बाजीराव पाटील, धामणीमध्ये नंदकिशोर इंगळे, शिरगाव येथे मुकुंद ठोंबरे यांची भेट घेतली. तासगाव तालुक्याच्या दौ-यात शैलजाभाभी पाटील यांनी महिलांशी संवाद साधत भाजपवर निशाणा साधला.


गेल्या दहा वर्षात जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. भाजपने जनतेला भूलविण्याचेच काम केले आहे. दुष्काळी भागाच्या विकासासाठी वसंतदादा पाटील यांनी अनेक योजना राबविल्या. त्यानंतर प्रकाशबापू पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासात योगदान दिले. वसंतदादा घराणे नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहे. विकासाचा दुष्काळ संपविण्यासाठी विशालदादा पाटील लोकसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. त्यांना साथ द्या, असे आवाहनही शैलजाभाभी पाटील यांनी केले.