| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४
काल सकाळी सांगलीचे आराध्य दैवत श्री गजाननाच्या दर्शन घेऊन सांगली लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल दादा पाटील यांनी सांगली शहरातील महत्त्वाच्या मार्गावरून पदयात्रा काढीत काँग्रेस कमिटी समोर मेळावा घेतला. या ठिकाणी उपस्थित असलेला दादा व काँग्रेसवर प्रेम करणारा सागर उफाळून आला होता. विशाल दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है | एकच वादा विशाल दादा | बघतो आता कोण रोखतंय | अशा जोरदार घोषणा मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यातून दिल्या जात होत्या.
एका बाजूला कार्यकर्त्यांचा जनसागर तर मंचावर काँग्रेस सह इतर सर्वच पक्षाचे नेते विशाल दादांच्या विजयाचे ग्वाही देत होते. त्यामुळे आता विशाल नावाचं हे वादळ भाजपा आणि महाआघाडीच्या नेत्यांवर चालू जाताना पहावयास मिळाले.
तत्पूर्वी विशाल दादांनी जत, कवठेमंकाळ, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेपूर, इस्लामपूर आदी भागात धावता दौरा केला होता. स्व. वसंतदादा पाटील, स्व. आर आर आबा, स्व नानासाहेब सगरे, स्व. अनिल भाऊ बाबर, स्व. पतंगराव कदम, स्व. राजारामबापू पाटील या दिवंगत नेत्यांच्या समाधीवर स्थळी जाऊन, त्यांना विनयंजली वाहिली. तेव्हा या सर्व दिवंगत नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विशाल दादांचा हा दौरा, एक नवे समीकरण म्हणून पाहिले जात आहे.
काल विशाल पाटील यांनी ज्या पद्धतीने विशाल दादा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर भाषण केले, त्यावेळी त्यांच्यातील संयम बरोबरच आक्रमकपणाही दिसून आला. विरोधकांना त्याने दिलेलं आव्हान विशाल दादातील नेतृत्वगुणाची चुणूक दर्शवून गेले.
एकंदरीतच कालचा मेळावा विरोधकांच्या उरात धडकी भरवणारा व महाआघाडीच्या नेत्यांना इशारा देणारा होता. आता हे वादळ क्षमणारे नाही, हेच सर्वांना दिसून आले. मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व पक्षांचा कार्यकर्ता पक्ष भेद विसरून विशाल दादांना पाठिंबा दिल्यामुळे विजयाचा गड सर करणे अवघड नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे, जे विशाल दादांच्या कार्यकर्त्यांना नवे बळ देणारे होते.