सांगली समाचार - दि. २ एप्रिल २०२४
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर व शिखर पहाडिया हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत. मात्र या चर्चांना अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही. अशातच काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी एअरपोर्टवर शिखरदेखील त्यांच्याबरोबर दिसून आला होता. पण त्याने बोनी यांच्याबरोबर फोटो घेण्यास नकार दिला. त्यावर सर्वच स्तरामध्ये चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर आता बोनी यांनी मौन सोडले आहे.
एअरपोर्टवर बोनी व शिखर यांच्या कृतीमुळे त्या दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच जान्हवी व शिखर यांच्यामध्ये दुरावा आल्याचेही समोर आले होते. पण असे काहीही नसल्याचे बोनी यांनी स्पष्ट केले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, "त्याला माझ्याबरोबर फोटो काढायचा नव्हता असे नाही. यामागील खरे कारण मला माहीत नाही पण मला अधिक महत्त्व मिळावं असं त्याला वाटत असावं".
पुढे ते म्हणाले की, "मला तो आवडतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा जान्हवी त्याच्याबरोबर नव्हती तेव्हाही माझं त्याच्याबरोबर खूप चांगलं होतं. तो जान्हवीचा कधीही एक्स होणार नाही. तो नेहमी तिच्याबरोबरच राहील. जान्हवी असो किंवा अर्जुन शिखर हा नेहमीच सर्वांची मदत करतो. तो असाच आहे".
दरम्यान जान्हवी व शिखर यांनी आतापर्यंत आपल्या नात्याची घोषणा केलेली नाही. पण सर्व कार्यक्रमांमध्ये किंवा सर्व ठिकाणी एकत्र दिसतात. जेव्हा जान्हवी बालाजी मंदिरात जाते तेव्हा शिखर नेहमी तिच्याबरोबर असतो. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. तो एक व्यावसायिक व प्रोफेशनल पोलो प्लेयर आहे.
जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती 'देवारा- भाग १', 'विश्वंभरा' व 'बडे मिया छोटे मिया' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याआधी ती 'मिली', 'गुंजन सक्सेना' या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या होत्या. तिच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते.