सांगली समाचार - दि ३ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या आरोग्य सेवेतून कॅशलेस सुविधांचा लाभ मिळत असतो. या सर्व कर्मचाऱ्यांना एक एप्रिलपासून आरोग्य सेवा आणि आयुष्मान योजनेच्या खात्याशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. या संदर्भात कुटुंब कल्याण मंत्रालायने सूचना जारी केल्या आहेत.
सर्व लाभार्थी कर्मचाऱ्यांची डिजिटल ओळख निश्चित करणे, त्यांची माहिती संकलित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना महिनाभराची मुदत देण्यात येणार आहे. १९५४ साली सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचे देशभरात ४१ लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनधारकांचाही यात समावेश आहे.