| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१९ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रचार, सभा आणि अर्ज दाखल केले जात आहे. राज्यामध्ये सांगलीची निवडणूक देखील रंगत होणार आहे. महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील हे आज शुक्रवार दि. १९ रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानूगडे पाटील यांच्यासह महविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दुपारी एक वाजता स्टेशन चौक ते मारुती चौक अशी रॅली काढली जाणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.पत्रकार परिषदेत गुंठेवारी चळवळीचे चंदन चव्हाण, उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर, विराज बोटाने, गणेश लोखंडे, विजय बल्लारी उपस्थित होते.
हे नेते उपस्थित राहणार
महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत, माजी मंत्री जयंतरावजी पाटील, यांच्यासह सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रमजी सावंत साहेब, अरुण अण्णा लाड, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते रोहित दादा पाटील, पृथ्वीराज बाबा पाटील, संजय बजाज, अनिताताई सगरे आदी नेते उपस्थित राहणार असल्याचा दावा यावेळी चंद्रहार पाटील यांनी केला आहे.