| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२३ एप्रिल २०२४
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' अशीच एक सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. नम्रता विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या चर्चेत असते.
नम्रताने सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर केलेत. ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये नम्रता खळखळून हसताना दिसतेय. हे फोटो शेअर करत पोस्ट लिहून नम्रताने एका खास व्यक्तीचे आभार मानले आहेत.
नम्रताने फोटो शेअर करुन पोस्ट लिहिलीय की, "हसले रे क्षण माझे हसले रे. संपूर्ण आयुष्य आपण असंच जगायला हवं , मनमोकळं , आपल्याला हवं तसं बिनधास्त , बेफाम.!! हसावं दिलखुलास रडावं धायमोकलून , कोण काय म्हणेल ह्याचा विचार न करता ओरडावं जोरजोरात , जे व्यक्त व्हावंसं वाटतंय ते बोलावं आतून बेंबीच्या देठापासून अगदी खरं खुरं, खूप निवांत आणि मोकळं मोकळं वाटतं. सारंग साठे मी मनमोकळं हसताना कशी दिसते हे पहिल्यांदा पाहीलं. thanks इतका सुंदर क्षण टिपल्याबद्दल."
आपले खास फोटो शेअर करत नम्रताने अभिनेता - दिग्दर्शक सारंग साठेचे आभार मानले आहेत. नम्रताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. ती लवकरच नाच गं घुमा सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नम्रतासोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, कविता मेढेकर या अभिनेत्री झळकणार आहेत. नम्रता या सिनेमात मोलकरणीची भूमिका साकारणार आहे. १ मे २०२४ ला नम्रताचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.