| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा कवठे महांकाळ येथुन सभासद श्री. हेमकांत मधुकर काकडे यांनी त्यांच्या घरगुती आडचणीसाठी रु.२ लाखाचे कर्ज घेतले होते. दिनांक १६/११/२०२३ रोजी कामावरुन घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला व त्यातच त्यांचे दुदैवी निधन झाले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यांना दोन लहान मुले असून उत्पन्नाचे कोणतेही साधन मागे नाही. आर्थिक स्थिती सुधारावी आणि आर्थिक विवंचनेतून बाहेर पडावे असे स्वप्न पाहुन त्यांनी कर्ज घेतले पण दुदैवाने त्यांच्या निधनामुळे चांगल्या हेतुने घेतलेले कर्ज त्यांच्या कुटूंबाला बोजा ठरले असते जर कर्मवीर पतसंस्थेने कर्जदारांना अपघाती विमा कवच उपलब्ध करुन दिले नसते तर ?
कर्मवीर पतसंस्थेने युनाईटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि.. सोबत करार करुन संस्थेच्या ५० लाखापर्यंतच्या कर्जदारास नाममात्र विमा हप्ता घेवून विमा कवच उपलब्ध केले यामुळे संस्थेचे कर्ज परतफेड होवून उर्वरीत रक्कम वारसाना परत केली जाते. या योजनेचा आकस्मिक आर्थिक संकटात कुटूंबाला आधार असून संस्थेचे कर्ज देखील सुरक्षित होत आहे.
नुकतेच मयत कर्जदार यांच्या पत्नी श्रीमती तेजस्वीनी हेमकां त काकडे व त्यांची दोन लहान मुले यांना संस्थेच्या वतीने कर्ज निल दाखला व उर्वरीत रकमेचा धनादेश संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील हस्ते व युनाईटेड इंडिया इन्शोरन्स कंपनीचे असि. रिजनल मॅनेजरश्री.एस. आर. पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आला. त्यावेळी काकडे यांच्या कुटूंबियांना गहिवरून आले. तसेच लहान मुलांना पाहुन उपस्थितांचे मन देखील हेलावून गेले.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित., सांगली च्या वतीने रु.५० लाख पर्यंतच्या कर्जदारास कर्ज रकमेएवढे अपघाती मृत्यु विमा कवच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या योजनेत समावेश असणाऱ्या कर्जदाराचा अपघाती मृत्यु झाल्यास शिल्लक कर्ज रक्कम परतफेड होवून उर्वरित रक्कम कर्जदाराच्या वारसांना दिली जाते.
या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस.पी. मगदुम . डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, श्री.ओ. के. चौगुले (नाना) डॉ. एस. बी. पाटील (मोटके) तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम उपस्थित होते.