| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१८ एप्रिल २०२४
सांगलीचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजय काका पाटील हे आज गुरुवार रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वास्तविक शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करायचा होता. परंतु वाढत्या उन्हाचा विचार करता मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर सांगलीतील स्टेशन चौकात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या तोफा धडा आणणार आहेत. भाजपा सह शिंदे गट शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि संजय काका यांच्या विरोधात आरोपांच्या पायरी जडत असताना त्याला हे नेते काय उत्तर देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे प्रचंड उष्मा असताना दुसरीकडे राजकीय ज्वर हे टिपेला पोहोचला आहे. जग चे माजी आमदार विलासराव जगताप, सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह मिरजेतील भाजपा नगरसेवकांनी संजय काका पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नारायणाची मोट संजय काकांच्या पाठीशी कशी उभी करतात याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिले आहे.
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल दादा पाटील यांनी याआधीच उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात उडी घेतली आहे. तर महाआघाडीचे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. सध्या तरी सांगलीत हे तीन पहिलवानच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने कोण वरचढ ठरणार याची चर्चा जिल्हा संपूर्ण राज्यात होताना दिसत आहे.