| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१८ एप्रिल २०२४
आपल्या भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. 'मेरा भारत महान, हॉर्न ओके प्लिज ' तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की 'जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी'. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.तुम्हालाही नक्कीच तुमच्या जीवनातलं अर्ध ज्ञान इकडेच मिळालं असं वाटेल.
रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एका टेम्पोच्या मागे लिहलेलं वाक्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या टॅम्पोच्या मागे लिहलं आहे की, "सरकार कोणतही असो महाराष्ट्र सुधारणार नाही' हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. हा जुना फोटो आहे मात्र निवडणुकांच्या रणधुमाळीत हा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतोय.