yuva MAharashtra संजय पाटील विशाल पाटलांच्यावर बरसले, म्हटलं तुझ्या भावाचा एकदा पराभव केला आहे, तुझाही केला आहे, आता दुसऱ्यांदा तुझा पराभव करणार !

संजय पाटील विशाल पाटलांच्यावर बरसले, म्हटलं तुझ्या भावाचा एकदा पराभव केला आहे, तुझाही केला आहे, आता दुसऱ्यांदा तुझा पराभव करणार !




| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२५ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदार संघाचा प्रचार आता चरण सीमेवर पोहोचला असून, मतदारसंघात आता हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. मैदानात असलेले आघाडीचे तिन्ही पैलवान हातात एकमेकांवर जोरदार प्रहार करताना दिसत आहेत.

काल भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजय पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला. आरपीआय आठवले गटाने संजय काकांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार बैठकीत बोलताना संजय काका म्हणाले मी तुझ्या भावाचा चेहरा पराभव केला आहे, एकदा तुझाही केला आहे. आणि आता परत एकदा तुझा पराभव करणार आहे.

आपल्या आजोबांचे नाव घेत असताना त्यांनी सुरू केलेल्या संस्था बंद पाडल्या. सहकारी संस्थांच्या जीवावर जगलेल्यांनी माझ्यावर टीका करू नये, असा जोरदार प्रहार संजय पाटील यांनी चढवला. 

यावेळी दीपक बाबा म्हैसाळकर शिंदे, शिवाजी डोंगरे, माजी उपमहापौर धीरज सुर्यवंशी तसेच आरपीआय गटाचे जगन्नाथ ठोकळे यांच्यासह आरपीआय गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.