yuva MAharashtra कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा ?

कमी मतदानाचा फटका कुणाला, फायदा कोणाचा ?



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२७ एप्रिल २०२४
२०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी झालेल्या मतदानात ४ टक्के घट झाली आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कुणाला आणि फायदा कुणाचा याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत.

हिंदी भाषिक राज्यांमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा ५.७ टक्के कमी मतदान झाले. लोकसभेच्या १०२ जागांमध्ये ६ टक्के कमी मतदान झाले. त्यानंतर मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागला आहे. शिवाय भाजपनेही मतदान वाढवण्यासाठी आपल्या रणनीतीत बदल केला आहे.


आकडेवारी काय सांगते ?

हिंदी भाषिक पट्ट्यातही गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ५.७ टक्के कमी मतदान.
भाजप व घटक पक्षांचे उमेदवार असलेल्या जागांवर २०१९च्या तुलनेत जवळपास ५.३२ टक्के कमी मतदान झाले आहे.
इंडिया आघाडीचे उमेदवार असलेल्या ठिकाणी मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २.५१ टक्के घटले आहे.

याचा अर्थ काय ? 

६ टक्के मतदान कमी होणे म्हणजे जवळपास ७३ हजार ते ९० हजार लोकांनी मतदान केलेले नाही. एवढा मोठा फरक निवडणुकीत जय किंवा पराजयासाठी कारणीभूत ठरू शकतो. २०१९ मध्ये भाजपने ५७ जागांवर ७५ हजार पेक्षा कमी मतांच्या फरकाने विजय मिळविला होता.